शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील एफटीआयआयच्या तरुणाची उत्तुंग भरारी; 'कळसूबाई'च्या माहितीपटाचा जर्मनीत बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:39 IST

कळसुबाईचे दोन प्रकारचे माहितीपट केले होते तयार

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईची गावागावात पूजा केली जाते, त्यावरूनच बसू यांनी प्रेरणा घेऊन कळसुबाई माहितीपट तयार केला.

पुणे: महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची जगभरात चर्चा केली जाते. राज्यात बऱ्याच गावांमध्ये कळसुबाईची आदराने पूजाही केली जाते. सर्वोच्च शिखराची महाराष्ट्रातील संस्कृती समजून घेण्यासाठी एफटीआयआयच्या युधाजीत बसू नावाच्या विद्यार्थ्याने माहितीपट तयार केला होता. त्याला जर्मनीतील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन स्पर्धेत विशेष सन्मान मिळाला आहे. पुण्यातल्या एफटीआय मधल्या २०१७ बॅचच्या विद्यार्थ्याने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. 

बसू यांनी कळसुबाईचे दोन प्रकारचे  माहितीपट तयार केले आहेत. पहिल्या प्रकारात फोटोंचा वापर केला असून त्यामध्ये कळसुबाईच्या जुन्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. तर दुसऱ्या प्रकारात गाण्यांच्या स्वरूपात संवाद दाखवला आहे. त्यामध्ये भूतकाळ आणि वर्तमानातील घटनांचा उल्लेख केला आहे. असे बसू यांनी सांगितले आहे. 

महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा, कोकण, कळसुबाई सारखी शिखरे यांची वेगळीच संस्कृती आहे. नागरिक पूर्वीपासूनच शिखराची पूजा करणे, समुद्राला नारळ वाहने अशा नैसर्गिक साधनांना महत्व देत आले आहेत. अशाच प्रकारे कळसुबाई शिखराची गावागावात पूजा केली जाते. त्यावरूनच बसू यांनी प्रेरणा घेऊन कळसुबाई माहितीपट तयार केला.

ते म्हणाले, मी एकदा माझ्या मित्रासोबत महाराष्ट्रातील संस्कृती जाणून घेण्यासाठी सर्वत्र फिरत होतो. तेव्हा माझ्यासाठी सगळे नवीनच होते. परंतु प्रत्येक ठिकाणी मला वेगवेगळ्या गोष्ट दिसू लागल्या. गावातील जनजीवन, स्त्रियांची शिकवण, पारंपरिक गोष्टी यांचा अभ्यास करण्याची उत्सुकता निर्माण झाली.

असेच एकदा फिरत असताना गावातील एका व्यक्तीने कळसुबाई शिखरावर एक जण राहत असल्याची माहिती दिली. कळसुबाई हे उंच शिखर असून त्याचा इतिहास आणि संस्कृती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. असे त्याने सांगितले.  त्यानुसार कळसुबाई शिखरावर माहितीपट तयार करण्याचे ठरवले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिकFTIIएफटीआयआयWomenमहिला