शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक बसस्थानकासमोर ‘बस बे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 20:18 IST

काहीवेळी बसथांब्यासमोर किंवा त्यालगत अन्य खासगी वाहने उभी असतात. त्यामुळे बसचालकांना थांब्यासमोर बस उभी करणे शक्य होत नाही.

ठळक मुद्देजवळपास तीन हजार बसथांब्यांसमोर बस बे तयार करण्याचे उद्दिष्ट

पुणे : शहरातील प्रत्येक बसथांब्यांसमोर ‘बस बे’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या ‘बस बे’ इतर खासगी वाहने थांबविल्यास त्यांच्यावर वाहतुक पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील अधिकाऱ्यांनी दिली. शहरात तीन हजारांहून अधिक बसथांबे आहेत. बसचालकांनी या बसथांब्यासमोर बस थांबवून प्रवाशांना घेणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकवेळा चालकांकडून थांब्यापासून काही अंतरावर बस थांबविली जाते. काहीवेळी बसथांब्यासमोर किंवा त्यालगत अन्य खासगी वाहने उभी असतात. त्यामुळे बसचालकांना थांब्यासमोर बस उभी करणे शक्य होत नाही. परिणामी प्रवाशांना धावपळ करत बस पकडावी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी पीएमपी व महापालिकेकडून विविध बसथांब्यासमोर  रंगाचे पट्टे मारून बस बे तयार केले जातात. मागील काही वर्षांत अनेक काही थांब्यावर असे बस बे करण्यातही आले होते. मात्र, कालांतराने ते पुसट झाल्यानंतर त्याकडे पुन्हा दुर्लक्ष झाले. त्यातही काही ठराविक मार्गांवरच हे बस बे होते.  आता जवळपास तीन हजार बसथांब्यांसमोर बस बे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे समजते. त्याची सुरूवातही करण्यात आल्याची माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिली. हे बस बे दीर्घकाळ टिकतील यादृष्टीने त्याची आखणी केली जाणार आहे. सर्व बस यामध्येच उभ्या राहतील याबाबत दक्षता घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनाही रस्त्याचे मधे जाऊन बस पकडण्याची जोखीम पत्करावी लागणार नाही. पिवळ्या रंगाचे पट्टे मारून तयार करण्यात आलेल्या बस बेमध्ये अन्य खासगी वाहनांना थांबता येणार नाही. अशी वाहने थांबल्याचे आढळून आल्यास वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांशीही चर्चा झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलRto officeआरटीओ ऑफीस