शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: चिंताजनक! पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८०५ तर पिंपरीत ८५५ कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:32 IST

केवळ ५९८ रुग्ण बरे होऊन घरी

ठळक मुद्देसक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार ७४०

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणीय  वाढ झाली असून दिवसभरात १ हजार ८०५ रुग्ण आढळून आले आहेत. तर, बरे झालेल्या केवळ ५९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३४१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार ७४० झाली आहे.   

 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ७८६  रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये ५ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९२५ झाली आहे. दिवसभरात एकूण ५९८  रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख १६५  झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २ लाख १४ हजार ८३० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार ७४०  झाली आहे.   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ८ हजार ६०२  नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख २९ हजार ५०२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

पिंपरीत ८५५ कोरोना रुग्णपिंपरी शहरात कोरोनाची वाढ सुरूच आहे. शुक्रवारी शहरात ८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.सद्यस्थीतीत शहरात ६१३४ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १२७५ रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर ४८५९ रुग्ण हे गृहविलगिकरणात उपचार घेत आहेत. गुरूवारी देखील शहरात ८१२ रुग्णांची नोंद झाली होती. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मोशीतील ७९ वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपळेसौदागर मधील ६५ वर्षीय पुरुष आणि फुगेवाडीतील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत १ लाख १२ हजार ३७० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ लाख ४ हजार ३६६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील १८७० जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७८७ अशा एकुण २६५७ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल