Corona Virus: चिंताजनक! पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८०५ तर पिंपरीत ८५५ कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:05 PM2021-03-12T19:05:39+5:302021-03-12T20:32:04+5:30

केवळ ५९८ रुग्ण बरे होऊन घरी

friday increase in corona patient pune city | Corona Virus: चिंताजनक! पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८०५ तर पिंपरीत ८५५ कोरोना रुग्ण

Corona Virus: चिंताजनक! पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ८०५ तर पिंपरीत ८५५ कोरोना रुग्ण

Next
ठळक मुद्देसक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार ७४०

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणीय  वाढ झाली असून दिवसभरात १ हजार ८०५ रुग्ण आढळून आले आहेत. तर, बरे झालेल्या केवळ ५९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३४१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार ७४० झाली आहे.   

 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ७८६  रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये ५ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९२५ झाली आहे.
 दिवसभरात एकूण ५९८  रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख १६५  झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २ लाख १४ हजार ८३० झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार ७४०  झाली आहे.   

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ८ हजार ६०२  नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १२ लाख २९ हजार ५०२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

पिंपरीत ८५५ कोरोना रुग्ण
पिंपरी शहरात कोरोनाची वाढ सुरूच आहे. शुक्रवारी शहरात ८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.सद्यस्थीतीत शहरात ६१३४ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १२७५ रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर ४८५९ रुग्ण हे गृहविलगिकरणात उपचार घेत आहेत. गुरूवारी देखील शहरात ८१२ रुग्णांची नोंद झाली होती. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मोशीतील ७९ वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपळेसौदागर मधील ६५ वर्षीय पुरुष आणि फुगेवाडीतील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत १ लाख १२ हजार ३७० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ लाख ४ हजार ३६६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील १८७० जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७८७ अशा एकुण २६५७ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

Web Title: friday increase in corona patient pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.