शुक्रवारी १७१ कोरोनाबाधित; २१३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST2021-09-18T04:11:55+5:302021-09-18T04:11:55+5:30

पुणे : शहरात शुक्रवारी २१५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर सात ...

Friday 171 coronated; 213 Corona free | शुक्रवारी १७१ कोरोनाबाधित; २१३ कोरोनामुक्त

शुक्रवारी १७१ कोरोनाबाधित; २१३ कोरोनामुक्त

पुणे : शहरात शुक्रवारी २१५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर सात हजार ८३१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.१८ टक्के इतकी आढळून आली आहे.

शहरातील सक्रिय रुग्णसंख्या आजमितीला एक हजार ८६२ सक्रिय रुग्ण आहेत, तर दिवसभरात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहाजण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्युदर हा १.८० टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १८१ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३२ लाख ६९ हजार ९६८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी चार लाख ९९ हजार ५३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी चार लाख ८८ हजार १९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत आठ हजार ९९४ जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------------

Web Title: Friday 171 coronated; 213 Corona free