५६ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST2021-03-25T04:10:28+5:302021-03-25T04:10:28+5:30

कार्यक्रमाची सुरुवात खाडे बालक आश्रमाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने सुरुवात केली. यावेळी शिक्षणाचे महत्त्व असणाऱ्या सुमारे २९ दिवंगत वर्गमित्रांना श्रध्दांजली ...

Fresh memories of students from 56 years ago | ५६ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

५६ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

कार्यक्रमाची सुरुवात खाडे बालक आश्रमाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने सुरुवात केली. यावेळी शिक्षणाचे महत्त्व असणाऱ्या सुमारे २९ दिवंगत वर्गमित्रांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड तालुका पंचायत समितीचे उपसभापती सयाजी ताकवणे होते. कार्यक्रमाचे आयोजन निवृत्त विक्रीकर उपआयुक्त पुणे खंडेराव खाडे यांनी केले होते. यावळी माजी विद्यार्थी खंडेराव खाडे, दशरथ बोत्रे, प्रकाश बोत्रे, सूर्यकांत बोत्रे, विलास जेधे, कुंडलिक काळभोर, दत्तात्रेय रणदिवे, दशरथ शेळके, आनंत शिंदे, मुरलीधर शितोळे, लक्ष्मण ताकवणे, वसंत आडागळे, रावसाहेब काटे, किशोर देवधर आदी उपस्थित होते. दादासाहेब जगताप यांनी आभार व्यक्त केले. न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एम. वाय. कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष माऊली ताकवणे, संतराज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला खाडे ,अधीक्षक बापू गोफने, सुदाम भापकर, बापू बडे उपस्थित होते तर सुनील ताकवणे यांनी सूत्रसंचालन केले.

--

--

फोटो क्रमांक : २४ केडगाव माजी विद्यार्थी मेळावा

फोटो ओळी : गलांडवाडी तालुका दौंड येथील स्नेहमेळाव्यात मिळत उपस्थित माजी विद्यार्थी.

Web Title: Fresh memories of students from 56 years ago