वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त

By Admin | Updated: May 20, 2014 23:34 IST2014-05-20T23:34:42+5:302014-05-20T23:34:42+5:30

वाघोली व आव्हाळवाडी परिसरात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. त्याचबरोबर, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

Frequently the power caused by the citizen is disconnected | वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त

वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त

आव्हाळवाडी : वाघोली व आव्हाळवाडी परिसरात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. त्याचबरोबर, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. वाघोली आव्हाळवाडी परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाघोलीमध्ये बाहेर गावाहून अनेक लोक स्थलांतरीत होत असल्याने गावची लोकसंख्या वाढत आहे. यामुळे येथे सर्व सुविधा पुरविणे अवघड होत आहे. त्यामध्ये वीजपुरवठा सारखा खंडीत होत असतो. घरातील उपकरणे बिघडत आहे आणि व्यावसायिक पूर्ण त्रस्त झाले आहेत. पीठगिरणी, दवाखाने, हॉटेल अशा अनेक व्यावसायिकांना याचा त्रास होत आहे. पिकांना पाणी वीजेअभावी पाणी देता येत नसल्याने पिकेही जळण्याच्या मार्गावर आहेत. केसनंद, वाडेबोल्हाई, भावडी या परिसरात पाणी आहे, पण वीज नाही अशी अवस्था झाली आहे. मात्र महावितरण अधिकारी बेफिकीर आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात वीज सुरू नाही केली, तर शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालयाला कुलुप लावून पुणे-नगर रस्ता अडवला जाईल, असा इशारा उपजिल्हा प्रमुख संजय सातव यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Frequently the power caused by the citizen is disconnected