मालवाहतूकदार २८ जूनला देशभर काळा दिवस पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:20+5:302021-06-22T04:09:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रासह देशातील मालवाहतूकदार २८ जून रोजी काळा दिवस पाळणार आहे. या वेळी ते ...

मालवाहतूकदार २८ जूनला देशभर काळा दिवस पाळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रासह देशातील मालवाहतूकदार २८ जून रोजी काळा दिवस पाळणार आहे. या वेळी ते काळ्या फिती लावतील तर आपल्या वाहनांवर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतील. यासंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने सोमवारी केंद्र सरकारला नोटीस दिली असल्याचे कार्यकारिणी सदस्य बाबा शिंदे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता मालवाहतुकीचे दर वाढविणे शक्य नाही. अशा परिस्थितीत व्यवसाय करणे मुश्किल होत आहे. तेव्हा केंद्र सरकारने डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करावा. शिवाय राज्य व केंद्र सरकारने लावलेले इंधनावर लावलेले अन्य कर देखील रद्द करावे, या मागणीसाठी हा काळा दिवस पाळण्यात येणार आहे. सरकारने याची दखल नाही घेतली तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशभर चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा इशारा बाबा शिंदे यांनी दिला.