छावण्यांमध्ये नि:शुल्क पशुवैद्यकीय सेवा
By Admin | Updated: September 23, 2015 03:02 IST2015-09-23T03:02:18+5:302015-09-23T03:02:18+5:30
छावण्यांमध्ये दाखल होणाऱ्या जनावरांना नि:शुल्क पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. टंचाई परिस्थिती संपुष्टात आल्याचे जाहीर होईपर्यंत ही सेवा पुरविली जाणार आहे.

छावण्यांमध्ये नि:शुल्क पशुवैद्यकीय सेवा
पुणे : छावण्यांमध्ये दाखल होणाऱ्या जनावरांना नि:शुल्क पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. टंचाई परिस्थिती संपुष्टात आल्याचे जाहीर होईपर्यंत ही सेवा पुरविली जाणार आहे.
छावण्यांत रोगप्रतिबंधक लसीकरण, पशुरुग्णांवर उपचार, जंतनाशके पाजणे, लहान मोठ्या शस्त्रक्रिया, खच्चीकरण, कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, वंध्यत्व तपासणी आदी सेवा पुरविल्या जाणार आहेत. राज्यात विविध भागात साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्यामार्फत छावण्या उभारण्यात आलेल्या आहेत. या छावण्यांत पशुसंवर्धन विभागामार्फत विविध सेवा पुरविल्या जातात. मात्र, आता या सर्व सेवा नि:शुल्क पुरविण्याचा आदेश काढण्यात आला आहे. हा शेतकऱ्यांसाठी दिलासा मानला जात आहे.