एनसीसीच्या विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड व मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:17+5:302021-07-15T04:09:17+5:30

रोबोकॉब कॉम्प्युटर्सचे संचालक प्रा. विजय जाधव, प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख, स्त्री स्वाभिमान, इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड प्रकल्पाच्या उत्पादन करणाऱ्या प्रा. ...

Free sanitary pads and masks for NCC students | एनसीसीच्या विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड व मास्क

एनसीसीच्या विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड व मास्क

रोबोकॉब कॉम्प्युटर्सचे संचालक प्रा. विजय जाधव, प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख, स्त्री स्वाभिमान, इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड प्रकल्पाच्या उत्पादन करणाऱ्या प्रा. दिपाली जाधव यांच्या हस्ते उपस्थित एनसीसीच्या ३० विद्यार्थिनींना यांचे वाटप करण्यात आले. एनसीसी विभागाच्या उपस्थितीनुसार सर्व ११५ विद्यार्थिनींना आठ पॅड असलेले सॅनिटरी पॅड पॅकेट, मास्क, सॅनिटायझर व साबण देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अनंतराव थोपटे महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रा. डॉ.लक्ष्मण अवघडे, एनसीसी विभागाच्या प्रमुख डॉ.पल्लवी मळेकर, प्रा धनंजय लंबाते, प्रा.अरुणा गोडसे, महाविद्यालयातील संगणक विभागाच्या कल्पना येलगुडे, निलम खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा.दिपाली जाधव यांनी विद्यार्थिनींना इको फ्रेंडली सॅनिटरी पॅडबद्दल आणि डॉ. पल्लवी मळेतर यांनी विद्यार्थिनींना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.

--

१४ भोर राजगड एनसीसी

अनंतराव थोपटे महाविद्यालयातील एनसीसीच्या मुलींना रोबोकाॅब काॅम्प्यटरकडून सॅनिटायझरी पॅडचे वाटप करताना.

Web Title: Free sanitary pads and masks for NCC students