मोफत पार्किंगला अधिसभेत विरोध

By Admin | Updated: September 29, 2014 05:39 IST2014-09-29T05:39:38+5:302014-09-29T05:39:38+5:30

महाविद्यालयांकडून पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

Free parking conflicts in the council | मोफत पार्किंगला अधिसभेत विरोध

मोफत पार्किंगला अधिसभेत विरोध

पुणे : महाविद्यालयांकडून पार्किंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेतही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु, अधिसभेतील बहुतांश सदस्यांनी मोफत पार्किंगला विरोध केला. त्यामुळे पुढील काळात मोफत पार्किंगच्या विषयावर विद्यार्थी संघटनांना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे.
महाविद्यालयांचे उपन्नाचे साधन बंद होणार असल्याने अधिसभेवर निवडून गेलेल्या संस्थाचालकांनी, तसेच प्राचार्यांनी मोफत पार्किंगला विरोध केला. परिणामी, विद्यापीठातर्फे पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम वाढीव शुल्कावर विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यात आला. परंतु, वाढविलेले शुल्क योग्य असून, त्यांना लवकरच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. विद्यापीठाने केंद्र शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी करार केला आहे. परंतु, कौशल्य अभ्यासक्रम केवळ पदव्युत्तर पदवीसाठी सुरू केले आहेत. पदवी अभ्यासक्रमापासूनच कौशल्यावरील अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी भूमिका अधिसभा सदस्यांनी मांडली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून महाविद्यालयांचे रोश्टर चुकीच्या पद्धतीने तपासून दिले जातात. तसेच रोश्टर तपासून न दिल्यामुळे महाविद्यालयांची शिक्षक भरती रखडली आहे. त्यामुळे संस्थाचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अधिसभा सदस्यांनी नमूद केले.

Web Title: Free parking conflicts in the council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.