मोफत पार्किगला अधिसभेत विरोध
By Admin | Updated: September 28, 2014 00:13 IST2014-09-28T00:13:46+5:302014-09-28T00:13:46+5:30
महाविद्यालयांकडून पार्किगच्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

मोफत पार्किगला अधिसभेत विरोध
>पुणो : महाविद्यालयांकडून पार्किगच्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभेतही या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु, अधिसभेतील बहुतांश सदस्यांनी मोफत पार्किगला विरोध केला. त्यामुळे पुढील काळात मोफत पार्किगच्या विषयावर विद्यार्थी संघटनांना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे.
महाविद्यालयांचे उपन्नाचे साधन बंद होणार असल्याने अधिसभेवर निवडून गेलेल्या संस्थाचालकांनी, तसेच प्राचार्यानी मोफत पार्किगला विरोध केला. परिणामी, विद्यापीठातर्फे पार्किगचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम वाढीव शुल्कावर विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यात आला. परंतु, वाढविलेले शुल्क योग्य असून, त्यांना लवकरच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. विद्यापीठाने केंद्र शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी करार केला आहे. परंतु, कौशल्य अभ्यासक्रम केवळ पदव्युत्तर पदवीसाठी सुरू केले आहेत. पदवी अभ्यासक्रमापासूनच कौशल्यावरील अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी भूमिका अधिसभा सदस्यांनी मांडली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या आरक्षण कक्षाकडून महाविद्यालयांचे रोश्टर चुकीच्या पद्धतीने तपासून दिले जातात. तसेच रोश्टर तपासून न दिल्यामुळे महाविद्यालयांची शिक्षक भरती रखडली आहे. त्यामुळे संस्थाचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अधिसभा सदस्यांनी नमूद केले.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचा परिनियम शनिवारी अधिसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना स्वायत्त होण्याचा व शिक्षण क्षेत्रत प्रयोग करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. गेल्या अधिसभेत यावर जोरदार चर्चा झाली होती. तसेच त्यात दुरुस्त्या सुचविण्यात आल्या. अखेर स्वायत्त महाविद्यालयांच्या कायद्याची मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली.
नगर उपकेंद्रांचा
प्रश्न सुटणार
पुणो विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रांमध्ये विद्याथ्र्यासाठी आवश्यक सोई-सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. युवराज नरवडे व अधिसभा सदस्य डॉ. अरुण पंदरकर यांनी अधिसभेत केली. त्यावर लवकरच विद्यापीठाचे प्रमुख पदाधिकारी नगर केंद्राला भेट देऊन तेथील प्रश्न सोडवतील, असे आश्वासन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिले.