शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:21 IST2021-02-21T04:21:19+5:302021-02-21T04:21:19+5:30
श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त श्री क्षेत्र महाळुंगे येथील राजमाता जिजाऊ महिला अस्मिता ...

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त श्री क्षेत्र महाळुंगे येथील राजमाता जिजाऊ महिला अस्मिता भवनात शनिवारी (दि.२०) विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेदिक रुग्णालय व श्रीपती बाबा महाराज नाट्य क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने केले होते.
यावेळी कार्यक्रमाला महाळुंगे पोलीस चौकीचे शरद खैरे, कृ.उ.बां. समिती खेडचे माजी सभापती विद्यमान सदस्य चंद्रकांत इंगवले, ज्येष्ठ नागरिक संघाचे विनायक महाळुंगकर, माजी उपसरपंच सुनील मिंडे, जयसिंग तुपे, दत्तात्रय काका भोसले, उद्योजक नारायण जावळे, बाळासाहेब महाळुंगकर, पोलीस पाटील सचिन भोपे, माजी उपसरपंच विशाल भोसले, ग्रामपंचायत सदस्य नितीन फलके, अनिल गायकवाड, विठ्ठल गायकवाड, सुनील गायकवाड, विशाल भालेराव, देवेंद्र मिंडे, केवल भालेराव आदी उपस्थित होते.
आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद- यावेळी आयोजित केलेल्या शिबिरात ८५ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. सामान्य तपासणीचा ७० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. तर सूत्रसंचालन अजिंक्य महाळुंगकर यांनी केले तर आभार लीलाधर तुपे यांनी मानले.
श्री क्षेत्र महाळुंगे येथे शिवजयंतीचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिर.