दुष्काळग्रस्तांसाठी मोफत चारा
By Admin | Updated: October 31, 2015 01:10 IST2015-10-31T01:10:16+5:302015-10-31T01:10:16+5:30
बोरी बुद्रूक येथील दुर्गामाता नवतरुण नवरात्रोत्सव मंडळाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४ ट्रक चारा मोफत पाठविण्यात आला, अशी माहिती दुगार्माता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दुष्काळग्रस्तांसाठी मोफत चारा
राजुरी : बोरी बुद्रूक येथील दुर्गामाता नवतरुण नवरात्रोत्सव मंडळाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४ ट्रक चारा मोफत पाठविण्यात आला, अशी माहिती दुगार्माता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
बोरी बुद्रूक (ता. जुन्नर) येथील दुर्गामाता नवतरुण नवरात्रोत्सव दरवर्षी नवरात्रात सामाजिक उपक्रम राबवतात. या मंडळांनी याही वर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील हरेश्वर कर्जुले या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी सुमारे ३ ट्रक ऊस, तसेच १ ट्रक हत्तीगवताचा असे ४ चार ट्रक चारा मोफत पाठविण्यात आला. तसेच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ ही संस्थेला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत म्हणून नवरात्रात दहा दिवस दानपेटीत जमा झालेली रक्कम या संस्थेकडे डी.डी.ने पाठविण्यात आली. हा चारा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तसेच या विभागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य माऊली खंडागळे व बोरी बुद्रक गावच्या सरपंच पुष्पा कोरडे यांच्या हस्ते पाठविण्यात आला. (वार्ताहर)