शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना 'भन्नाट' गिफ्ट ; सोशल डिस्टनसिंगचे मात्र तीन तेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 16:34 IST

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा उद्या (दि.१०) वाढदिवस आहे. या निमित्ताने पुणे भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस कोरोनाची पार्श्वभुमी लक्षात घेता लोकोपयोगी कार्यक्रम करुन साजरा करण्यात येत आहे. पण या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी बुधवारी प्रचंड गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे तीन तेरा वाजलेले पाहायला मिळाले.

भाजपच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी संघटनात्मक पातळीवर विविध समाजपयोगी उपक्रम राबवले जात असतात. आज ( दि.९) देखील कोथरूड भागातील चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅसचे कुपन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मात्र,या उपक्रमाची माहिती मिळताच शहरातील रिक्षाचालकांनी सकाळपासूनच पाटील यांच्या कोथरूड येथील संपर्क कार्यालयाबाहेर गर्दी कऱण्यात सुरुवात केली. मात्र, या निमित्ताने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्स, मास्क वापर यांसारख्या विविध नियमांचे तीनतेरा वाजलेले निदर्शनास आले. 

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा १० जून रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने पुणे भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात वंचित घटकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा देखील समावेश आहे. तसेच पुणे शहरातील रिक्षाचालकांना देखील या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर एक भन्नाट गिफ्टचे वाटप करण्यात येत आहे. रिक्षाचालकांना २०० रुपयांच्या सीएनजी गॅसची ५ कुपने मोफत दिली जाणार आहे. हे कुपन घेण्यासाठीच बुधवारी सकाळपासूनच पाटील यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. रिक्षाचालकांची मोफत सीएनजी गॅस कुपन घेण्यासाठी कर्वे पुतळा ते मृत्युंजयेश्वर मंदिरापर्यंत लांबच लांब रांग होती. यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे चित्र बघायला मिळाले. 

चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त वंचित घटकांच्या मोफत लसीकरणाची मोहीम सुद्धा हाती घेण्यात आली आहे. यासाठी देखील कुपन वाटप मंगळवारी करण्यात आले असून उद्या हे लसीकरण पार पडणार आहे. या लसीकरणाचा अनेकांना लाभ होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाauto rickshawऑटो रिक्षा