कर्ज देण्याच्या अमिषाने फसवणूक
By Admin | Updated: February 24, 2015 23:04 IST2015-02-24T23:04:17+5:302015-02-24T23:04:17+5:30
कंपनीच्या नावावर कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

कर्ज देण्याच्या अमिषाने फसवणूक
पुणे : कंपनीच्या नावावर कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने आरोपीला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
अब्दुल हसन सय्यद (लक्ष्य एन्टरप्रायजेस, इंदिरा चेंबर्स, टिळक रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात रवि विरन्न कुमार (रा. खेड, जि. पुणे) आणि पृथ्वी आईल मिलचे मालक राजुद्दीन कादर मुलाणी (विटा, ता. कडेगाव, जि. सांगली) हे दोघे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)