सव्वा सात कोटींची फसवणूक, जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST2020-12-06T04:11:15+5:302020-12-06T04:11:15+5:30

पुणे :बुधवार पेठेतील नऊ इलेक्‍ट्रीकल् दुकानदारांकडून ७ कोटी १७ लाख ५७ हजार रुपयांचा माल उधारीवर घेऊन त्याचे पैसे न ...

Fraud of Rs 7.25 crore, bail rejected | सव्वा सात कोटींची फसवणूक, जामीन फेटाळला

सव्वा सात कोटींची फसवणूक, जामीन फेटाळला

पुणे :बुधवार पेठेतील नऊ इलेक्‍ट्रीकल् दुकानदारांकडून ७ कोटी १७ लाख ५७ हजार रुपयांचा माल उधारीवर घेऊन त्याचे पैसे न देता फसवणूक केल्या प्रकरणात महिलेचा जामीन न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया यांनी हा आदेश दिला.

जान्हवी प्रल्हाद हरियाणी (रा. मीरा सोसायटी, शंकरशेठ रस्ता) असे या महिलेचे नाव असून फरासखाना पोलिसांनी तिला आणि तिच्या पतीला पंजाबमधून अटक केली होती. हा प्रकार गत वर्षापासून सुरू होता. या बाबत सुरेश शिवनदास जेठवाणी (वय ३६, रा. कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी जेठवाणी यांच्या दुकानातून सुमारे २ कोटी ४६ लाख ८७ हजार रुपयांच्या मालाची उधारीवर खरेदी केली. अन्य आठ दुकानातूनही अशाच प्रकारे वस्तू घेतल्या. न्यायालयीन कोठडीत असताना तिने जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला

Web Title: Fraud of Rs 7.25 crore, bail rejected