गुंतवणुकीस भाग पाडून १ कोटी ६० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:47+5:302020-11-22T09:39:47+5:30

याप्रकरणी मुकेश मुंकुदलाल मुरजानी (वय ४४, रा. कृष्णकुंज सोसायटी, कॅम्प) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संजय ...

Fraud of Rs 16 million by forcing investment | गुंतवणुकीस भाग पाडून १ कोटी ६० लाखांची फसवणूक

गुंतवणुकीस भाग पाडून १ कोटी ६० लाखांची फसवणूक

Next

याप्रकरणी मुकेश मुंकुदलाल मुरजानी (वय ४४, रा. कृष्णकुंज सोसायटी, कॅम्प) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संजय अगरवाल आणि मनिष अगरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०१६ ते मार्च २०१८ दरम्यान घडला.

लिमिटलेस हॉस्पिटॅलिटी एलएलपी कंपनीचे कोरेगाव पार्क येथे कार्यालय आहे. आरोपींनी मुकेश मुरजानी यांच्याकडून व्यवसायासाठी पैसे घेतले. स्वत: व्यवसायामध्ये काहीएक पैसे न गुंतविता फिर्यादी यांनी गुंतविलेले पैसे तसेच त्यातून मिळणारा नफा स्वत:च्या फायद्याकरीता परस्पर त्यांचे स्वत:चे लिमिटलेस ब्रेवर्ली हिल्स कंपनीमध्ये वळता केला. तसेच नफ्याचे रोख पैसे स्वत: घेतले. फिर्यादींना काही एक परतावा न देता. त्यांच्या पैशांचा अपहार करुन त्यांची १ कोटी ६० लाख १७ हजार ६२० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of Rs 16 million by forcing investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.