परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:10 IST2021-09-11T04:10:54+5:302021-09-11T04:10:54+5:30

किरण सूर्यकांत ढेरंगे यांनी मंचर पोलीस ठाण्यात विमल शंकर प्रसाद व अश्विनीकुमार या दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. याबाबत मंचर ...

Fraud by the lure of a job abroad | परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक

किरण सूर्यकांत ढेरंगे यांनी मंचर पोलीस ठाण्यात विमल शंकर प्रसाद व अश्विनीकुमार या दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण सूर्यकांत ढेरंगे हे नोकरीच्या शोधात होते. नोकरी शोधत असताना विमल शंकर प्रसाद (वय ४५ रा. सहारगाव अंधेरी पूर्व, मुंबई) व त्याचा भागीदार अश्विनीकुमार (रा. पंजाब) या दोघांनी १० सप्टेंबर २०१९ ते आजपर्यंत मी तुला परदेशात नोकरीला लावतो असे खोटे सांगून फिर्यादीकडून रक्कम घेतली. ऑनलाइन ३ लाख २ हजार ५०० रुपये व १ लाख ७५ हजार रुपये रोख असे एकूण ४ लाख ७७ हजार ५०० रुपये घेऊनही फिर्यादीला नोकरी मिळवून दिली नाही. तसेच पैसेसुद्धा परत दिले नाही. फिर्यादी किरण ढेरंगे यांनी अनेक वेळा फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नसून एकाही मेसेजचा रिप्लाय मिळाला नाही. त्यामुळे किरण ढेरंगे यांनी विमल प्रसाद व अश्विनी कुमार यांच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहे.

Web Title: Fraud by the lure of a job abroad