परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST2021-05-31T04:08:20+5:302021-05-31T04:08:20+5:30

पुणे : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यात ४ लाख ६० हजार रुपये भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी ...

Fraud in the lure of getting a job abroad | परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक

परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक

पुणे : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यात ४ लाख ६० हजार रुपये भरण्यास सांगून फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

अनुप ढोरमले (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यापूर्वी एकाला अटक करण्यात आली असून, त्याची जामिनावर सुटका केली आहे. याबाबत ३२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. १४ ते ३१ जुलै २०२० या कालावधीत ही घटना घडली.

आरोपींनी फिर्यादीला विविध फोन नंबरवरून संपर्क साधून खोटी ओळख देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला विविध बँक खात्यात ४ लाख ६० हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे देऊन देखील नोकरी न लावता तसेच घेतले पैसे परत न करता फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनुप याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.

--------------------------------------------------------

Web Title: Fraud in the lure of getting a job abroad