शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

विमा कंपन्यांची फसवणूक

By admin | Updated: September 22, 2014 05:25 IST

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत कॅशलेस सुविधेचा काही रुग्णालयांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे उघडकीस आले आहे

राजानंद मोरे, पुणेसार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत कॅशलेस सुविधेचा काही रुग्णालयांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे उघडकीस आले आहे. बोगस रुग्णांच्या नावाने प्रस्ताव तयार करून ही रुग्णालये कंपन्यांकडून फुकटचा पैसा लाटत आहेत. शहरातील एका बड्या रुग्णालयाने अशा प्रकारे तीन बोगस प्रस्ताव तयार करून कंपनीला फसविल्याचे निदर्शनास आले असून, कंपनीकडून संबंधित रुग्णालयाची चौकशी सुरू आहे. सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांसह खासगी कंपन्यांकडूनही विविध प्रकारच्या मेडिक्लेम पॉलिसी योजना तयार करण्यात आल्या आहेत. अनेक जण या पॉलिसीचा फायदा घेतात. मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत कॅशलेस व रिंबर्समेंट (प्रतिपूर्ती) या सुविधा दिल्या जातात. कॅशलेश सुविधेमध्ये पॉलिसीधारक किंवा कुटुंबातील सदस्य एखाद्या रुग्णालयात उपचार घेत असल्यास उपचाराचे पैसे भरावे लागत नाहीत. संबंधित विमा कंपनीकडून थेट रुग्णालयाला हे पैसे दिले जातात. तर रिंबर्समेंट सुविधेमध्ये आधी रुग्णाला आधी रुग्णालयाचा खर्च द्यावा लागतो. त्यानंतर कंपनी संबंधिताला खर्चाची प्रतिपूर्ती करत असते. या दोन्ही सुविधांचा मोठा फायदा सर्वसामान्यांना होत असतो. मात्र, काही रुग्णालयांकडून मेडिक्लेम सुविधेचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे.शहरातील एका बड्या रुग्णालयाने मेडिक्लेम पॉलिसीसाठी तीन बोगस रुग्णांचे प्रस्ताव सार्वजनिक क्षेत्रातील दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीकडे सादर केले होते. याबाबत अधिक माहिती देताना कंपनीचे पुणे विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक विजयेंद्र थोरबोले म्हणाले, की यापूर्वी या रुग्णालयात मेडिक्लेम सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांच्या नावाने बोगस प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावाला जोडलेली कागदपत्रे, बिले, त्यावरील सह्याही बनावट करण्यात आल्या होत्या. प्रस्तावाच्या पडताळणीदरम्यान ही बाब कंपनीच्या निदर्शनास आली. कंपनीकडील खऱ्या रुग्णाची सही, छायाचित्रे पाहिल्यानंतर हे प्रस्ताव खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीने रुग्णालयाकडे याबाबत चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयाने कंपनीची फसवणूक झाल्याचे लेखी मान्य न केल्यास पोलिसांत गुन्हा दाखल होईल. शहरात अशा प्रकारे कंपनीची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार झाले असून, त्यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र, तरीही अजून असे प्रकार सुरू आहेत. यापुढेही संबंधित रुग्णालयांवर कंपनीकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच त्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ही करू शकतो, असे थोरबोले यांनी सांगितले.