एक्झिट परमिट काढून देण्याच्या बहाण्याने परदेशी नागरिकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:54+5:302021-01-08T04:28:54+5:30
पुणे : उपचारासाठी परदेशातून पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आलेल्यांना परत जाण्यासाठी एक्झिट परमीटची आवश्यकता असते. हे एक्झिट परमीट काढून देण्याचे आमिष ...

एक्झिट परमिट काढून देण्याच्या बहाण्याने परदेशी नागरिकांची फसवणूक
पुणे : उपचारासाठी परदेशातून पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आलेल्यांना परत जाण्यासाठी एक्झिट परमीटची आवश्यकता असते. हे एक्झिट परमीट काढून देण्याचे आमिष दाखवून दाेघा परदेशी नागरिकांना बनावट परमीट काढून देऊन १८ हजार रुपयांची फसवणूक केली. विशेष शाखेमधील परकीय नागरिक नोंदणी विभागातील पोलीस शिपाई सचिन सहाणे यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
नविंदर सिंग (रा. दिल्ली) आणि ॲन्जेस कोनेह (रा. सिअरा लिऑन देश) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिअरा लिऑन देशातून माबीनटी नाबुस कामरा आणि बेआटाराईस यात्ता टॉमी हे दोघे हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले होते. उपचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या देशात परत जायचे होते. त्यासाठी त्यांना एक्झिट परमीट मिळविण्यासाठी त्यांच्या देशातील एका महिलेने सिंग याच्याशी संपर्क करायला सांगितला. त्यानुसार परमीट देण्यासठी सिंग याने त्यांच्याकडे १८ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यान त्याने २२ ऑगस्ट २०२० रोजी मुंबई येथील परदेशी नागरिक कार्यालयात अर्ज केला. त्यातील काॅलम १५ मध्ये फेरफार करुन त्यामध्ये ११ हजार ५२० रुपये फी नमूद करून बनावट एक्झिट परमीट तयार करुन दोघांना पाठविले. बनावट एक्झिट परमीटचा प्रकार लक्षात गुन्हा दाखल करण्यात आला. विनाखर्च एक्झिट परमीट मिळत असताना अशा प्रकारे बनावट कागदपत्राचा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण अधिक तपास करीत आहेत.