शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अपघात दाव्यातून उघड झाली विमा कंपनीची फसवणूक; लष्कर पोलिसांकडे फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:00 IST

दोघांना बनावट पॉलिसी काढून देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तुषार सावरकर (वय ३२, रा़ कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आरोरा टॉवरला कार्यालय आहे़, २०१२ मध्ये घडला होता प्रकारकंपनीने कागदपत्रे पडताळणी केली, त्यानंतर पॉलिसी बनावट असल्याचे झाले़ निष्पन्न

पुणे : शिवाजीनगर न्यायालयातील मोटार अपघात दाव्यातील एका प्रकरणाची कागदपत्रे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे आली़ त्यातील पॉलिसी पाहिल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात आले़ त्यानंतर कंपनीच्या वतीने बनावट पॉलिसी काढून देऊन फसवूणक करण्यात आल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे़ आतापर्यंत दोघांना बनावट पॉलिसी काढून देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे़ याप्रकरणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तुषार सावरकर (वय ३२, रा़ कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आरोरा टॉवरला कार्यालय आहे़ हा प्रकार २०१२ मध्ये घडला होता़ याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवाजीनगर येथील मोटार अपघात न्यायालयात एक दावा दाखल करण्यात आला आहे़ त्यातील क्लेमबाबत दाखल करण्यात आलेल्या विमा पॉलिसीची कागदपत्रे कंपनीला मिळाली़ कंपनीने त्याची पडताळणी केली, तर ती पॉलिसी बनावट असल्याचे निष्पन्न झाले़ बाबासाहेब महादेव कुदळे यांना एकाने फोन करून पॉलिसी उतरून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना बनावट पॉलिसी काढून दिली होती़  पैगंबर इस्माइल शेख हे आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आले होते़ त्यांनाही बनावट पॉलिसी दिल्याचे उघड झाले़ त्यानंतर कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक काटे तपास करीत आहेत़  

टॅग्स :Puneपुणे