कर्जाच्या आमिषाने फसवणूक
By Admin | Updated: March 25, 2017 04:02 IST2017-03-25T04:02:51+5:302017-03-25T04:02:51+5:30
खादी ग्रामोद्योग आणि केवायएसी खात्याचे अनुदानित कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांची १२ लाख ३० हजारांची फसवणूक करण्यात आली.

कर्जाच्या आमिषाने फसवणूक
पुणे : खादी ग्रामोद्योग आणि केवायएसी खात्याचे अनुदानित कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांची १२ लाख ३० हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींनी कर्जमंजुरीची बनावट पत्रेही दिली.
विठ्ठल बबन जमदाडे (रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर), दत्तात्रय सखाराम शिंदे (रा. राशीवडे, ता. राधानगरी, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी औदुंबर रोडगे (वय ४६, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी रोडगे आणि त्यांच्या मित्रांना खादी ग्रामोद्योग व केवायएसी खात्याचे अनुदानित कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून २०१३ ते २०१४ या कालावधीमध्ये १२ लाख ३० हजार रुपये उकळले. त्यांना बँक आॅफ इंडियाची कर्जमंजुरीची बनावट कागदपत्रे तयार दिली. त्यांना सबसिडीचे आमिष दाखवत फसवणूक केली.