पशुखाद्य व्यावसायिकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST2021-09-09T04:14:12+5:302021-09-09T04:14:12+5:30

याप्रकरणी वैभव दादाभाऊ थोरात यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल २०२० ते ...

Fraud of animal feed trader | पशुखाद्य व्यावसायिकाची फसवणूक

पशुखाद्य व्यावसायिकाची फसवणूक

याप्रकरणी वैभव दादाभाऊ थोरात यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल २०२० ते ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत वैभव दादाभाऊ थोरात यांच्या तांबडेमळा हद्दीतील पशुखाद्य विक्री केंद्रात जहुर असलम सय्यद याने तक्रारदारास विश्वासात घेऊन सरकी पेंड ७,४४,७०० रुपये गोळी पेंड २,९७,१५० रुपये असा १०,४१,८५० रुपयांचा पशुखाद्य माल उधारीवर खरेदी केला. थोरात यांना अनेक वेळा पैसे देण्याचे आश्वासन देऊन, सदरचे पैसे न देता आरोपीने दुकान बंद करून त्याचा मोबाइल बंद ठेवून पळून गेला आहे. याप्रकरणी वैभव थोरात यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे करीत आहेत.

Web Title: Fraud of animal feed trader