चौघा जणांंविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 21, 2016 00:24 IST2016-06-21T00:24:46+5:302016-06-21T00:24:46+5:30

उरुळी कांचन येथे १६ जून रोजी सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली होती. त्या विवाहितेच्या जावेने नवरा, सासू, सासरा व नणंद वेळोवेळी शारीरिक

Fourth person filed a criminal complaint | चौघा जणांंविरुद्ध गुन्हा दाखल

चौघा जणांंविरुद्ध गुन्हा दाखल

लोणी काळभोर : उरुळी कांचन येथे १६ जून रोजी सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली होती. त्या विवाहितेच्या जावेने नवरा, सासू, सासरा व नणंद वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची तक्रार दिली आहे.
या प्रकरणी रमनियता प्रशांत बडेकर (वय ३०, रा. बडेकरनगर, उरुळी कांचन, सध्या मळद, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती प्रशांत भुजंगराव बडेकर, सासू जनाबाई भुजंगराव बडेकर, सासरे भुजंगराव वामन बडेकर (तिघेही रा. बडेकरनगर, उरुळी कांचन) व नणंद प्रज्ञा देवानंद वाघमारे (रा. हडपसर) या चौघांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमनियता व प्रशांत यांचा विवाह १६ डिसेंबर २०१२ रोजी झाला. त्यानंतर जानेवारी २०१३ पासून सासरे व सासू तिला व्यवस्थित स्वयंपाक येत नाही, तसेच इतर कारणांवरून तिला टोचून बोलत होते. नवरा प्रशांत यास दारूचे व्यसन असल्याने तो आपली तल्लफ भागवण्यासाठी घरांतील रॉकेल, गहू, तांदूळ, भांडी विकत असे. समजावून सांगितले तर तो मारहाण करत असे. सासू-सासरेही त्याचीच बाजू घेत. तिचा दीर प्रदीप हा त्याची पत्नी आशा ऊर्फ वर्षा हिस तू भिकारी आहेस. आमची बरोबरी करू शकत नाहीस. तू घरांतून निघून जा, असे म्हणून दारू पिवून मारहाण करत असे. तिचाही असाच छळ सुरू होता.
९ जून रोजी रमनियता माहेरी निघून गेली. त्यानंतर १४ जून रोजी रात्री आशा ऊर्फ वर्षा हिने सासरचा छळ असह्य झाल्याने रॉकेल अंगावर ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू असताना १५ जून रोजी मृत्यू झाला. तिचे आईने आशा हिचा पती, सासू, सासरा, दीर व दोन नणंदा यांच्याविरोधांत फिर्याद दिली.
यावरून तिचा पती प्रदीप भुजंगराव बडेकर यास अटक करण्यात आली आहे. ही माहिती रमनियता हिला १७ जून रोजी वर्तमानपत्र वाचल्यानंतर समजली. त्यानंतर तिने १८ जून रोजी आपणांसही पती,
सासू-सासरे व नणंद शारीरिक
व मानसिक छळ करत असल्याची तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Fourth person filed a criminal complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.