शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
4
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
5
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
6
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
9
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
12
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
13
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
14
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
15
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
16
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
17
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
18
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
19
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
20
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या

चौदा वर्षांच्या मुलीवर ९ जणांचा सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षांच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षांच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा करून रिक्षाचालकाने अपहरण केले. त्यानंतर मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या हरविलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना या मुलीला पोलिसांनी चंढीगडहून ताब्यात घेतले. त्यानंतर हा भयावह प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडितेवर बलात्कार करण्यात आला.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यात रेल्वेचे दोन कर्मचारी, ५ रिक्षाचालक आणि अन्य आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार तब्बल दोन दिवस हे नराधम या मुलीवर अत्याचार करत होते. पहिल्या दिवशी चौघांनी, तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.

मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय २७, रा. वैदूवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (वय ३२, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ), रफिक मुर्तजा शेख (वय ३२, रा. मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय २७, रा. कासेवाडी), प्रशांत सॅमियल गायकवाड (वय ३२, रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय २९, रा. घोरपडी गाव), नोईब नईम खान (वय २४, रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (वय ३६, रा. लोहीयानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची बिहार येथील आहे. तिचे वडील वानवडीत एका ठिकाणी माळीकाम करतात. ती तिच्या आईवडिलांसोबत राहते. ३१ ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या बिहार येथील मित्राला भेटायला निघाली होती. घरच्यांना याची माहिती न देताच ती पुणे स्टेशन परिसरात आली होती. मात्र, तो मित्र आलाच नाही. तसेच रात्री कोणतीही रेल्वे नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. आरोपींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला रात्री राहण्याची सोय करतो, उद्या रेल्वेत बसवून देतो, असे सांगितले. त्यामुळे ती या रिक्षाचालकाबरोबर गेली.

रिक्षाचालकाने वाटेत आणखी एका रिक्षाचालकाला बरोबर घेतले. तेथून तिला एका लॉजला नेले. तेथे तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन रिक्षाचालकांनी तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, हा प्रकार कोणाला सांगितला तर, आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लोकांच्या ताब्यात तिला दिले. दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर मुलगी रेल्वेने मुंबई आणि तेथून चंढीगडकडे गेली होती.

--