चारचाकी पलटी; दोन जागीच ठार

By Admin | Updated: December 22, 2014 23:38 IST2014-12-22T23:38:30+5:302014-12-22T23:38:30+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर १ (इंदापूर) येथे देवदर्शन करून घरी चाललेल्या गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले

Four-wheeler; Two killed on the spot | चारचाकी पलटी; दोन जागीच ठार

चारचाकी पलटी; दोन जागीच ठार

पळसदेव : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर १ (इंदापूर) येथे देवदर्शन करून घरी चाललेल्या गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर दोन लहान मुली जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी (दि. २२) पहाटे चार वाजता झाला.
याबाबत भिगवण पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शन करून पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या चारचाकीचा चालकाच्या बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ‘सर्विस रोड’ वर चारचाकी
पलटी झाली. त्यामध्ये मंगेश अशोक राऊत (वय २१ रा.टेंभूर्नी ता.माढा जि.सोलापूर) व अर्चना किसन घाडगे (वय २८ रा.उजनी टेंभूर्नी ता .माढा जि.सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अनुजा किसन घाडगे आणि ऋतिका किसन घाडगे या दोन लहान मुली जखमी झाल्या . हा अपघात पहाटे ४ वाजता झाल्याची माहिती मिळाली. याबाबत किसन गोरख घाडगे यांनी फिर्याद दिली असून तेही या अपघातात किरकोळ जखमी आलेले आहेत. याबाबत पुढील
तपास भिगवण पोलीस ठाण्याचे हवालदार ए .एस .काळे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Four-wheeler; Two killed on the spot