व्यावसायिकांना चार हजारांचा दंड
By Admin | Updated: December 16, 2014 04:20 IST2014-12-16T04:20:22+5:302014-12-16T04:20:22+5:30
प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना,दुकानातील साहित्य देण्यासाठी दुकानदार तसेच विविध प्रकारचे व्यवसायिक प्लॅस्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करतात.

व्यावसायिकांना चार हजारांचा दंड
पिंपरी : प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना,दुकानातील साहित्य देण्यासाठी दुकानदार तसेच विविध प्रकारचे व्यवसायिक प्लॅस्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा व्यावसायिकांविरूद्ध महापालिकेने कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कृष्णानगर भाजी मंडई,साने चौक परिसरातील व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून महापालिकेने चार हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. असे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कृष्णानगर भाजी मंडई आणि साने चौकातील व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. फळे, भाजी विक्रेते या व्यावसायिकांकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून अशा सात किलोग्रॅम वजनाच्या प्लॅस्टिक जप्त करण्यात आल्या. नियमाचे उल्लंघन करून कॅरिबॅगचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्याकडून चार हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
केंद्र शासनाने लागू केलेल्या प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीक कॅरिबॅग उत्पादन व वापरास महापालिकेने बंदी घातली आहे. तरीही प्लॅस्टीक पिशवी उत्पादकांकडून उत्पादन सुरू आहे. (प्रतिनिधी)