शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

शाळांसाठी साडेचार हजार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:29 IST

आंतरराष्ट्रीय मंडळाच्या निवड अंतिम टप्प्यात; शैक्षणिक प्रयोग करण्याची मिळणार मुभा

पुणे : प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता देण्यासाठी राज्यभरातून साडेचार हजार अर्ज आले होते. त्यातून आता १०० शाळांची निवड केली जाणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली निवडीची ही प्रक्रिया अखेर मार्गी लागली असून येत्या आठवडाभरात शाळांची निवड यादी जाहीर केली जाणार आहे.राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनाव्यात या हेतूने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळालेल्या शाळांमध्ये वेगळी अभ्यासपद्धती, मूल्यमापनपद्धती राबविली जाणार आहे. या शाळांमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक प्रयोग करण्याची मुभा असणार आहे. राज्य शासनाने ३० नोव्हेंबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. यानुसार या शिक्षण मंडळाची संलग्नता मिळविण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले. त्यानुसार शाळांनी या मंडळाची संलग्नता मिळविण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या शाळा, अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा सर्वांना यासाठी अर्ज करता येणार होते. त्याला राज्यभरातून अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला, ४ हजार ९५५ शाळांनी अर्ज केले. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक ३३२ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वांत कमी ३४ शाळांनी अर्ज केले आहेत.शाळांचे नेतृत्त्व, तिथल्या शिक्षकांची गुणवत्ता, शाळेचे ध्येय, शाळेला मिळत असलेली प्रशासकीय मदत आदी बाबींचा विचार करून प्राथमिक यादीमध्ये ४५५ शाळांची निवड करण्यात आली. या ४५५ शाळांना भेटी देणे, तिथल्या सुविधांची पाहणी करणे आदी कामे समितीमार्फत पार पाडण्यात आली. या समितीमध्ये शासन, स्वयंसेवी संस्था, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आलेला होता. त्यांच्याकडून शाळांची काटेकोर तपासणी करून निवडण्यात आलेल्या शाळांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे.येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवातशाळांची निवड झाल्यानंतर लगेच मे महिन्यात तिथल्या शिक्षकांचे निवासी शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ कसे कार्यरत राहील, त्याचा अभ्यासक्रम कसा असेल, शिक्षकांकडून काय अपेक्षा असतील, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून २०१९) लगेच शाळांची सुरुवात होईल.प्राथमिक शाळांची निवड... आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळासाठी पहिल्या टप्प्यात १ ली ते ५ वी पर्यंतच्या प्राथमिक शाळांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील इयत्ता वाढविल्या जाणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे सुरुवातीचे प्रयोग हे प्राथमिक शिक्षणाबाबत केले जाणार आहेत.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण