शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरणारे चौघे अटकेत, साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:20 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू असून यातील दोघे जण चोरीच्या उद्देशानेच पुण्यात विसर्जन मिरवणुकीत आले होते. फरासखाना आणि विश्रामबाग पोलिसांनी या चौघांकडून आतापर्यंत दोन लाख रुपयांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत.शेहबाज सैय्यद अली सैय्यद अहमद अली (वय २२, रा. हिंगणघाट, जि. वर्धा), विशाल चव्हाण, फग्गीर मोहम्मद अहमद शेख (वय ३५, रा. चित्ताह कॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई), बशीर निसार शेख (वय २३, रा. आझादनगर वानवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चोरलेल्या अनेक मोबाइलमधील सिमकार्ड हे फेकून दिले होते. तर, काही सिमकार्ड त्यामध्येच होते. सैय्यद अली याच्याकडून फरासखाना पोलिसांनी ९५ हजारांचे दहा मोबाइल जप्त केले आहेत. त्याच्याविरोधात फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विश्रामबाग पोलिसांनी विशाल चव्हाण याच्याकडून १० हजाराचा एक, फग्गीर शेखकडून २० हजारांचे दोन, तर, बशीर शेख याच्याकडून सुमारे ८० हजारांचे ७ मोबाइल हस्तगत केले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात आतापर्यंत सुमारे एक हजार तर, फरासखाना पोलीस ठाण्यात २०० ते ३०० आॅनलाईन तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामध्ये युवक युवतींचे मोबाइल लांबवल्याचे प्रकार अधिक आहेत. दगडूशेठ गणपती मंडप, लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, उंबºया गणपती चौक, लोकमान्य टिळक चौक, कुंटे चौक या गर्दीच्या भागामध्ये आरोपींनी नागरिकांचे मोबाइल लंपास केले होते. मोबाइल लंपास झाल्यानंतर अनेकांनी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. पोलिसांकडे दाखल असणाºया तक्रारींची तपासणी सुरू असून आतापर्यंत अर्ध्यापेक्षा अधिक मोबाइल मालकांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. तर, अन्य मोबाइल मालकांचा शोध सुरू आहे. ज्या नागरिकांचे मोबाइल विसर्जन मिरवणुकीमध्ये चोरीला गेले असतील त्यांनी मोबाइलची कागदपत्रे घेऊन विश्रामबाग आणि फरासखाना पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जन