बारामतीत चार टँक रने पाणी
By Admin | Updated: March 26, 2015 23:03 IST2015-03-26T23:03:22+5:302015-03-26T23:03:22+5:30
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात पाणीटंचाई वाढत चालली आहे. बारामती पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

बारामतीत चार टँक रने पाणी
बारामती : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात पाणीटंचाई वाढत चालली आहे. बारामती पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
याबाबत पंचायत समितीने दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील विविध गावांतून पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरच्या मागणीसाठी १२ प्रस्ताव आले होते. यातील चार प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तालुक्यातील बाबुर्डी, शेरेवाडी, जळगाव क.प. अंतर्गत भिलारवाडी, लोणी भापकर, तर काळखैरेवाडी अंतर्गत राजबाग येथे तीन टँकरच्या माध्यमातून १० फेऱ्यांद्वारे या पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात २२ वाड्यांतील ५८९४ लोकसंख्येला याचा फायदा होत आहे.
या गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांच्या टँकरसाठी आलेला प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेला आहे, अशी माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे.