मांडवगण फराटामध्ये मटका अड्ड्यावर कारवाई, चार संशयित आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:10 IST2021-04-28T04:10:32+5:302021-04-28T04:10:32+5:30
मांडवगण फराटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर मंदिराच्या परिसरात काही व्यक्ती शनिवारी रात्रीच्या दोन वाजण्याच्या ...

मांडवगण फराटामध्ये मटका अड्ड्यावर कारवाई, चार संशयित आरोपींना अटक
मांडवगण फराटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर मंदिराच्या परिसरात काही व्यक्ती शनिवारी रात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारास "कल्याण" नावाचे मटका-जुगाराचे आकड्यावर लोकांच्याकडून पैसे लावून जुगाराचा खेळ खेळत आहेत, अशी माहिती गुप्त खबऱ्यामार्फत शिरुर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मटक्याचे आकडे लिहिलेली डायरी, निळ्या रंगाचे बॉलपेन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. श्रीपती देवराम इथापे, मनोहर श्रीपती इथापे, सुनील राजाराम तोरणे, संतोष राठोड (सर्व राहणार मांडवगण फराटा ) हे मटक्याच्या खेळ खेळत होते. सदर आरोपींवर पोलिसांनी कारवाई करीत अटक केली आहे. तपास शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस नाईक राहुल भागवत, पोलीस नाईक अनिल आगलावे, होमगार्ड धर्मा खराडे, विनोद शिंदे हे करीत आहेत.