शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तीस वर्षांपासून दुरावलेले चार भावंडे भेटले योगायोगाने एकाच गावात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:38 IST

उदरनिर्वाहासाठी पायांना भिंगरी लावून गावोगावी भटकणाऱ्या व शिक्षणापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकाला सोशलमीडियाविषयी ना आनंद आणि दु:ख...

वालचंदनगर : सोशल मीडियामुळे हल्ली संपूर्ण जग एका क्लिकवर आल्याचे बोलले जाते. याच सोशलमीडियावर पााहिजे ती गोष्टी शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. यातल्या बऱ्याच गोष्टी हाताशी लागतात. काही सापडतात तर काही तशाच कायम तपासावर शिक्का घेवून अनुत्तरीत राहतात. पण उदरनिर्वाहासाठी पायांना भिंगरी लावून गावोगावी भटकणाऱ्या व शिक्षणापासून वंचित असलेल्या दुर्बल घटकाला सोशलमीडियाविषयी ना आनंद आणि दु:ख... अशाच दुर्लक्षित घटकातील घिसाडी समाजातल्या एका कुटुंबातील तीस वर्षांपासून दुरावलेले चार भावंडे योगायोगाने इंदापूर तालुक्यातील एका गावात परत भेटले. त्यावेळी त्या भावडांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. जांब ता. इंदापूर येथे हा प्रसंग घडला. रामा, भीवा, राघु,सोमा घिसाडी आपल्या आईवडिलांचा पारंपारिक घिसाडी व्यवसाय करून गेल्या ३० वर्षांपासून हे ४ भावंडे एकमेकांपासून दुरावले होते. दरवर्षी त्यांचे गाव ठरलेले असल्यामुळे मजल दरमजल करत आपली उपजीविका भागविण्यासाठी भटकंती करताना एका कुटुंबाचे आगमन इंदापूर तालुक्यातील जांब या गावात झाले होते. थोरला भाऊ त्याच दिवशी रणगाव येथील काम उरकून बारामतीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला घिसाडी आलेले दिसले. त्याने आपला घोड्याचा गाडा जागेवर थांबून पाहिले तेव्हा सख्खा भाऊ समजले. त्यानंतर दोन दिवसांनी या कुटुंबाचा मुक्काम वाढला आणि आणखी दोन भावांचे कुटुंब त्या गावात दाखल झाले. चारही भाऊ आपआपल्या बायका पोरां संसारासह एकमेकांना त्याक्षणी भेटले. त्यामुळे चार भावंडाचा संसार प्रत्यक्षात पाहावयास मिळाले त्यावेळी मिळकत व परिस्थितीपेक्षा एकमेकांच्या चौकशीत मग्न होते. एक घोडा गाडीचे चार गाड्या झाल्या हेच त्यांच्या कुटूंबाची एकत्रित संपत्ती दिसून आल्याने रामा, भीवा, सोमाच्या चेहऱ्यावर आनंदच ही आनंद दिसत होता. पुन्हा चारही घोडा गाड्या एकत्रितपणे पोटापाण्यासाठी दुसऱ्या गावाला धुराळा उडत दौडू लागल्या..-------

टॅग्स :Indapurइंदापूर