दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:07 IST2021-03-30T04:07:22+5:302021-03-30T04:07:22+5:30

फकीर मोहम्मद शेख (वय २८, रा. अहमदनगर), कमलेश बाळासाहेब दाणे (वय २१, रा. नारायण पेठ, अहमदनगर), सलमान सादिक शेख ...

Four robbers arrested for robbery | दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक

फकीर मोहम्मद शेख (वय २८, रा. अहमदनगर), कमलेश बाळासाहेब दाणे (वय २१, रा. नारायण पेठ, अहमदनगर), सलमान सादिक शेख (रा. मोमीनपुरा, जि. बीड) व सलीम दगडू पठाण (वय २८, रा. मुकुंदनगर, अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : यवत पोलीस कर्मचारी सोमवारी (२९मार्च) रोजी पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना त्यांना केडगाव परिसरामध्ये एक पांढऱ्या रंगाची बिगर नंबर प्लेटची होंडा सिटी कार नजरेस पडली. पोलिसांनी संशयाने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता त्या कारमधील ५ आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व ५ पैकी ४ आरोपींना पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन सोहेल मोमीन, राहणार बीड हा आरोपी पसार झाला आहे. पोलिसांना आरोपी जवळ चार मोबाईल, एक कटावणी, स्क्रू ड्रायव्हर ,मिरचीपूड, सुती दोरी, चाकू, दोन लोखंडी कटावणी, दोन काळ्या रंगाचे बुरखे, नंबर प्लेट असा मुद्देमाल आढळून आला आहे.

ही कामगिरी आर. आर. गोसावी, बी. व्ही. चोरमले, डी. एस .बनसोडे, व्ही. एल .जाधव, टी. ए .करे, पोसई गंपले, होमगार्ड खंडागळे व गायकवाड यांनी केली. अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

---

Web Title: Four robbers arrested for robbery