वडगाव रासाई येथे अवैध वाळु चाेरी प्रकरणी चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST2021-03-17T04:12:52+5:302021-03-17T04:12:52+5:30
नाकाबंदी करुन शिरूर पोलिसांनी अवैध वाळु वाहतुक करणारे दोन ट्रक व दोन मोटारीवर कारवाई करुन ४८ लाख ३५ ...

वडगाव रासाई येथे अवैध वाळु चाेरी प्रकरणी चौघांवर गुन्हा
नाकाबंदी करुन शिरूर पोलिसांनी अवैध वाळु वाहतुक करणारे दोन ट्रक व दोन मोटारीवर कारवाई करुन ४८ लाख ३५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराजी झुंबर नागवे (वय ४० रा. वडगाव दरेकर, ता. दौंड), हायवा चालक वसंत बाळासाहेब येळे (रा. पारोडी ता. शिरूर) मोटारचालक नितीन अशोक कवडे (रा. आजनुज ता. श्रीगोंदा), दुसरा मोटारचालक दिलीप निवृत्ती येळे (रा. पारोडी,ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मांडवगण फराटा येथुन नागरगावच्या दिशेने अवैध रित्या वाळु वाहतुक करणारे दोन ट्रक सापडूनये या साठी पुढे असणारी एम मोटार जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिरूर पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस नाईक संजु जाधव, प्रविण पिठले, योगेश गुंड यांच्या पथकाने पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास
वडगाव रासाई चौकात नाका बंदी करुन आलेले दोन ट्रक पकडले. यात सात ब्रास वाळु आढळली. पुढे असलेले मोटार चालक ट्रक पकडु नये म्हणुन मागोवा घेत असल्याचे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समजले. त्यानुसार शिरूर पोलिसानी या चार ही वाहनांना ताब्यात घेऊन कारवाई केली.