वाघाच्या कातड्यासह चौघांना अटक
By Admin | Updated: September 30, 2015 01:30 IST2015-09-30T01:30:55+5:302015-09-30T01:30:55+5:30
गावठी पिस्तुल व काडतुसे विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे वाघाचे कातडेही सापडले. त्यांच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघाच्या कातड्यासह चौघांना अटक
पुणे : गावठी पिस्तुल व काडतुसे विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे वाघाचे कातडेही सापडले. त्यांच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. उमेश विश्वंभर जायभाय (वय २२, रा. जायभायवाडी, ता. जामखेड), प्रफुल्ल आवडसिंग जाधव (३०, पाटस, ता. दौंड, मूळ सातेफाटा, ता. फलटण, जि. सातारा), अर्जुन राजेंद्र खंडाळे (२१, पाटस) व सु. सु. सोनावणे (१९) अशी आरोपींची नावे आहेत.
--------
त्यांच्याकडून वाघाच्या कातड्यासह एक गावठी पिस्तुल, दोन काडतुसे, दोन रॅम्बो चाकू, वाघाचे कातडे व एक चारचाकी वाहन, असा एकूण ४ लाख ३० हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात आर्म
अॅक्ट व महा पोलीस कायद्यानुसार उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.