शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

लोणीकाळभोरला तक्रार दिली म्हणून चौैघांना बेदम मारहाण : आठ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:29 IST

सकाळी झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिली या कारणावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या ११ साथीदारांच्या मदतीने चार तरुणांना कोयता, तलवार, चाकू, लोखंडी गज, बॅट, स्टंप व पाइपच्या साहाय्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून यांमध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देदहशतीमुळे कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही.

लोणी काळभोर : सकाळी झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिली या कारणावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या ११ साथीदारांच्या मदतीने चार तरुणांना कोयता, तलवार, चाकू, लोखंडी गज, बॅट, स्टंप व पाइपच्या साहाय्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून यांमध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात दशहत निर्माण होऊन लोकांची पळापळ झाली. दुकानेही बंद करण्यात आली.याप्रकरणात राज वलटे ( वय २४, रा. पठारेवस्ती ), अभिजित रामदास बडदे  (वय २८, रा. अंबिकामाता मंदिर रोड, घोरपडेवस्ती), इनायत हसन खान (वय १७, रा. समतानगर, नुरीमस्जिद मागे ) व  शुभम जयपाल सिंग ( वय २१, रा. पठारेवस्ती) हे चार जण जखमी झाले आहेत. यापैकी राज वलटे याच्या डोक्यात कोयता व तलवारीने वार करण्यात आल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी अभिजित बडदे याने दिलेल्या फिर्यादीवरून युवराज माणिक आंबुरे, फिरोज महम्मद शेख, इमरान मोहम्मद शेख, इफरान मोहम्मद शेख, अमन मौलोदिन शेख, राहुल वसंत उगाडे, समीर ऊर्फ मुन्ना सय्यद व गिड्ड्या ऊर्फ मौलोदिन शेख ( सर्व रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील युवराज आंबुरे हा सराईत गुन्हेगार आहे. पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इराणीवस्तीनजीकच्या मोकळ्या जागेत सलमान शेरखान पठाण, शुभम सिंग, इनायत खान, शाहरूख सय्यद, बबलू आदी मित्र बसलेले असताना आंबुरेसह त्याचे सात साथीदार आले. त्यांनी तुम्ही इथे का बसता? असे विचारले व शिवीगाळ करत इनायत खान यास लाथा-बुक्क्यांनी बेदाम मारहाण केली. यात खान यास हात-पाय व पाठीस जबर मुक्कामार लागला. काही वेळाने ते आठजण निघून गेले. खान यास अभिजित बडदे याने आपल्या मित्राच्या मदतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आणले. परंतु, त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याने पोलिसांनी त्यास ससून रुग्णालयात पाठवले. त्यानंतर बडदे व सलमान शेरखान पठाण हे दुचाकी (एमएच १२ एनएच ४६९४) वरून घरी जाण्यासाठी निघाले. दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास ते  लोणी काळभोर गावातील पाषाणकर बाग चौकात आले असता अचानक समोरून पाच ते सहा दुचाकीवरून युवराज आंबुरे हा आपल्या साथीदारांसमवेत आला. ते शिवीगाळ करत गाड्यांवरून उतरले. तेव्हा युवराज आंबुरे याचे हातात कोयता, फिरोज शेख याचेकडे तलवार, इमरान शेख याचे हातात पाइप, इफरान शेख याचेकडे लोखंडी गज, अमन शेख याचेकडे स्टंप, राहूल ऊगाडे याचे हातात बॅट, समिर ऊर्फ मुन्ना सय्यद याचेकडे चाकू, व इतर दोन ते तीन अनोळखीचे हातात लोखंडी गज होते. आंबुरे बडदे याचेजवळ आला व तू आमचेविरोधांत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेला. तुझा माज उतरवतो. आता याला सोडू नका रे, असे म्हणत त्याने उलट्या कोयत्याने वार केला. बडदे याने तो उजव्या हातावर झेलला. सदर प्रकार पाहून तेथे उभा असलेला बडदे याचा मित्र राज वलटे हा भांडण सोडवण्यासाठी आला. त्यावेळी आंबुरे याने तुु याची बाजू घेतोस, तुला खलास करतो. असे म्हणत धारदार कोयत्याने त्याचेवर वार केला. सदर वार डोक्यात बसलेने वलटे रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. त्याचवेळी सर्वजण बडदे व सलमान पठाण यास आपले हातात असलेल्या बॅट, स्टंप, पाईप, लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तर आंबुरे याने मोठा दगड बडदे याचे दुचाकी वर टाकलेने मोठे नुकसान झाले. ते सर्वजण आपल्या हातातील हत्यारे नाचवत आमच्या कोणी नादी लागायचे नाही. म्हणून आरडाओरडा करत होते. सदर दहशतीमुळे कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. घबराट पसरली त्यामुळे आठवडे बाजारात खरेदीसाठी निघालेले महिला व पुरुष सैरावैरा पळत सुटले. दुकानदारांनी दुकाने बंद केली. सर्वजण आपल्या हातातील हत्यारे नाचवत शिवीगाळ करत दुचाकीवरून निघून गेले. जमलेल्या लोकांनी तीन जखमींना उपचारासाठी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर ससून रुग्णालय पुणे येथे नेले. यामध्ये वलटे याचे डोक्यात आठ टाके पडले आहेत, तर बडदे यास गुडघा व हाताला, इनायत खान यास मांडी व छातीस आणी सिंग याचे पायास जखमा झाल्या आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाPoliceपोलिस