शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

भिगवण परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:42 IST

भिगवण परिसरात दोन ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला पलटी होऊन अपघात झाला. तर दुसरा अपघात हा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या चारचाकीला घडला

ठळक मुद्देकार अपघातात विजापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर

इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.१०) पहाटेच्या सुमारास दोन त्यांच्या अंतराने भिगवणच्या परिसरातील डाळज नं.३ व लोणी देवकर गाव येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन सख्ख्या लहान बहिणींसह,दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा मृत्यु झाला असून तिघे जण जखमी झाले आहे.गुरुवारी (दि.१० मे) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उमरग्याहून पुण्याकडे निघालेली ट्रॅव्हल्सची बस ऊसाच्या शेतात पलटी होवून अपघात झाला. त्यामध्ये चैताली दगडू सोनकांबळे (वय आठ वर्षे),ऋतिका दगडू कांबळे (वय पाच वर्षे, दोघी रा.आंबेडकर चौक,खडकी,पुणे) या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात एक जण जखमी झाला आहे.दुसऱ्या अपघातात लोणी देवकर गावच्या हद्दीत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या कारच्या अपघातात राकेश श्रीनिवास,माधव प्रसाद जहागीरदार (दोघे रा.सध्या विजापूर) हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर मरण पावले. विनोद एस.मठ(वय २३वर्षे),सिध्दार्थ मजगी(वय २४ वर्षे,दोघे सध्या रा.विजापूर) हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण विजापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. जखमींवर इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बाहेर हलवण्यात आले आहे.

टॅग्स :BhigwanभिगवणAccidentअपघातDeathमृत्यू