आणखी चार आरोपींना अटक
By Admin | Updated: January 10, 2015 00:44 IST2015-01-10T00:44:24+5:302015-01-10T00:44:24+5:30
अमोल बधे याच्या खून प्रकरणातील आरोपींना फरार होण्यास व पुण्याबाहेर वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्या गजा मारणे टोळीतील चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे

आणखी चार आरोपींना अटक
पुणे : नीलेश घायवळ टोळीतील अमोल बधे याच्या खून प्रकरणातील आरोपींना फरार होण्यास व पुण्याबाहेर वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्या गजा मारणे टोळीतील चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर बधे खूनप्रकरणातील आरोपींची संख्या १९ झाली आहे. मोक्काचे विशेष न्यायाधीश पी. पी. कुलकर्णी यांनी आरोपींना १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
विशाल विलास धुमाळ (वय २८, रा. राजेंद्रनगर, नवी पेठ), योगेश नारायण मोहिते (वय २७, रा. श्यामसुंदर सोसायटीसमोर, म्हात्रे पूल, दत्तवाडी), बाळकृष्ण ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते (वय ३०, रा. सांगली) व सोमप्रशांत मधुकर पाटील (वय ४२, रा. बाणेर, बालेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
मारणे टोळीने २९ नोव्हेंबर रोजी भरदिवसा वैकुंठ स्मशानभूमीजवळ घायवळ टोळीतील तिघांवर खुनी हल्ला केला होता. त्यात अमोल बधे याचा मृत्यू झाला होता; तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते.
धुमाळ याने इतर अटक आरोपी व पोलीस शोध घेत असलेल्या आरोपींना पुणे सोडून जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती, तसेच त्यांना
लपून राहण्यासाठी आर्थिक मदत
केली आहे. ती वाहने जप्त करायची आहेत. त्यांना कोठे लपवून ठेवले
होते? योगेश मोहिते यानेही घटनेच्या दिवशीच आरोेपींच्या जेवणाची व पळण्याची व्यवस्था केली होती, तर पांड्या मोहिते याने अग्निशस्त्रे, काडतुसे पुरवली आहेत.
अशा प्रकारे त्यांना आणखी कोणी मदत केली आहे का? संपर्कासाठी कोणती सिमकार्ड वापरले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद सरकारी वकील प्रताप जाधव यांनी केला. न्यायालयााने युक्तिवाद ग्राह्य
धरला.
(प्रतिनिधी)
४या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १९ जणांना अटक केली आहे. त्यांपैकी १४ जण हे न्यायालयीन कोठडीत असून दोन जण पोलीस कोठडीत आहेत. तर, गुरुवारी चौघांना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात आणले होते.