शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून; जुन्नर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 19:04 IST

पत्नीवर बलात्कार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा देखावा पतीने केला होता...

ठळक मुद्देया तपासादरम्यान पती संजय माळी याच्या अनेक गोष्टी संशयास्पद वाटल्याने लक्ष केंद्रित

नारायणगाव : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने चार महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना कांदळी ( ता. जुन्नर ) येथील उबरकास मळा येथे सोमवारी ( दि. ६ ) दुपारी ३ ते ५ वा सुमारास घडली.  दरम्यान, पत्नीवर बलात्कार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा देखावा पतीने केला होता. प्रथमदर्शनी पोलिसांना देखील तसेच वाटले होते. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर पतीनेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.  या खूनप्रकरणी मयत महिलेचे वडील शाम बापु फुलमाळी(रा. उबरकास मळा, कांदळी) यांनी फिर्याद दिली आहे . कविता संजय माळी  (वय २२ ) रा. उबरकास मळा , कांदळी ता.जुन्नर जि.पुणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे . या खुनप्रकरणी पती संजय माळी याला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार , शाम फुलमाळी हे कांदळी येथे वाट्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करत आहेत. त्यांच्या घराच्या शेजारीच विवाहित मुलगी कविता आणि जावई संजय माळी हे राहत होते. ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे .काल ( दि ६ ) दुपारी ३ वा सुमारास कविता हिने मका कापून घरी घेऊन गेली , काही वेळाने वडिलांना कविता ही शेतातील रोडने विरोबा मंदिराकडे जात असताना दिसून आली होती . बराच वेळ वाट पाहून कविता घरी आली नसल्याने तिचे वडील ,भाऊ यांनी शोध घेतला असता ५ वा सुमारास विशाल कुतळ यांच्या उसाच्या सरीमध्ये कविता हिचा मृतदेह आढळून आला. यावेळी कविताच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते. बाजुलाच एक तंबाखुची पुडी, एक चुनापुडी, एक आढळून आली. या घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे व पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली असता महिलेच्या मृतदेहाजवळ मिळालेली चिठ्ठीचा कागद हा संजय माळी यांच्या घरातील एका वहीचा कागद असल्याचे प्रथम निदर्शनास आले. आढळलेल्या चिठ्ठीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने कवितांच्या चारित्र्याविषयी वाईट लिहिले होते. कवितांचा शोध घेत असताना संजय माळी याने मला अंगात येऊन देवाने कविता एका उसाच्या शेतात आहे असा दृष्टांत दिला आहे असे सांगितले.त्यावरून नातेवाईकांनी जवळील उसाच्या शेतात शोध घेतला असता  कविताचा मृतदेह आढळून आला होता. या तपासादरम्यान तसेच अनेक गोष्टी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पती संजय माळी याचेवर लक्ष केंद्रित करून त्यास ताब्यात घेतल्या नंतर खुनाचा कट त्यानेच केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले .या पुढील तपास अर्जुन घोडे पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत .

टॅग्स :Junnarजुन्नरMurderखूनPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक