पेठवडगावातील चार अल्पवयीन मुली बेपत्ता
By Admin | Updated: March 5, 2015 00:45 IST2015-03-05T00:43:42+5:302015-03-05T00:45:00+5:30
बंगाली कारागिरांवरही काहींनी संशय व्यक्त केला. पोलिसांना ‘त्या’ मुली पुण्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

पेठवडगावातील चार अल्पवयीन मुली बेपत्ता
पेठवडगाव : येथील चार अल्पवयीन मुली बुधवारी अचानक बेपत्ता झाल्या आहेत. या मुली अज्ञात असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला. ही घटना सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मात्र, या घटनेची नोंद रात्री उशिरा पोलिसांत झाली.
पोलिसांनी तीन पथके तयार केली असून, पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. ‘त्या’ मुली पुण्यापर्यंत गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुली १२ ते १७ वयोगटांतील आहेत. त्यात सध्या दोन बहिणींसह मामाच्या दोन मुली आहेत.पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (दि. ४) या मुली सकाळी घरातील कामे करीत होत्या. सहा वाजता घरातील इतर उठले असतामुली घरात नसल्याचे दिसून आले. घरच्यांनी शोधाशोध केली असता त्या मिळून आल्या नाहीत.दरम्यान, घराजवळील मैत्रिणीने चौघी घरातून जात असताना पाहिले. तिने विचारणा केली असता सहलीला जात असल्याचे त्यांनी सांगितले. चौघी घरात न सांगता निघून गेल्यामुळे त्यांची शोधाशोधसुरू केली. शहरात व पाहुण्यांकडे चौकशी केली. दुपारपर्यंत थांगपत्ता लागला नाही. म्हणून त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी चौकशी सुरू केली. मुलींचे फोटो घेऊन तत्काळ तीन पथके रवाना केली. घराजवळील परप्रांतीयांपैकी काही आजच गावी गेले. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील कामगारांकडे चौकशी केली. मात्र, यश आले नाही. बंगाली कारागिरांवरही काहींनी संशय व्यक्त केला. पोलिसांना ‘त्या’ मुली पुण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पथक रवाना झाले आहे.
दरम्यान, अज्ञात व्यक्तीने फूस लावून आमच्या ताब्यातील मुलींना पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)