शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील चौघे जेरबंद; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 22:01 IST

संबंधितांनी खोटा दस्तऐवज खोटे जागामालक म्हणून फसवणूक केल्याचे निदर्शनास

वाघोली : आव्हाळवाडी येथील जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील चौघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले.

       याप्रकरणी अपूर्व सुभाषचंद्र नागपाल (रा. क्लोवर हिल्स, कोंढवा) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भैरवनाथ बाबुराव साळुंखे (वय ३२ रा. कोरेगाव पार्क) योगेंद्र रघुनाथ खिस्ते (वय ३८, रा. विमान नगर) संदीप सेवकराम बस्तानी (वय ३८, रा. लोणकर वस्ती मुंढवा) सुदेश संभाजी राव (वय ३४, रा. पिंपळे गुरव) यांना ताब्यात घेतले आहे

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी येथील येथील गट क्रमांक १२३५ मध्ये विकत घेतलेले एकूण चार एकर क्षेत्र व त्यामधील फार्महाउस नागपाल यांच्या भावाच्या नावावर आहे. मात्र काहीजण या जागेवर साफसफाई करीत असल्याची माहिती कळल्यावर नागपाल यांना चौकशी केली असता संबंधित जमीन अपूर्व नागपाल व इतरांकडून विकत घेतली असून चेकने ईसार पावती म्हणून एक कोटी रुपये दिल्याचे व उर्वरित साडेसहा कोटी रुपये खरेदीखताच्या दिवशी देणार असल्याचे समजले. मात्र आपणच अपूर्व नागपाल असून याआधी कधीच आपली भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

      संबंधितांनी खोटा दस्तऐवज खोटे जागामालक म्हणून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने नागपाल यांनी पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांना वाघोली येथून अटक केली असून अधिक तपासासाठी लोणीकंद पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

      सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, दत्ता जगताप, अनिल काळे, गुरू जाधव,  अभिजित एकशिंगे, बाळासाहेब खडके, प्रमोद नवले यांनी केली आहे.तर पुढील तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर हे करीत आहेत.

 

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक