महामार्गावरील अपघातात ४ जखमी
By Admin | Updated: February 2, 2016 00:56 IST2016-02-02T00:56:14+5:302016-02-02T00:56:14+5:30
पुणे - मुंबई महामार्गावर देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाच्या हद्दीत लष्करी कार्यशाळेजवळ कामगारांना घेऊन जाणारी खासगी कंपनीची बस आणि मोटार यांच्यात सोमवारी सकाळी आठच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली

महामार्गावरील अपघातात ४ जखमी
देहूरोड : पुणे - मुंबई महामार्गावर देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाच्या हद्दीत लष्करी कार्यशाळेजवळ कामगारांना घेऊन जाणारी खासगी कंपनीची बस आणि मोटार यांच्यात सोमवारी सकाळी आठच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. त्याचवेळी मागून आलेली दुचाकी मोटारीवर जोरात आदळल्याने झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ज्योती विशाल तिवारी (वय ३०), विशाल विनोद तिवारी (३४, दोघे रा. टिटवाळा, मुंबई), अभिजीत मलाईरतन बेरा (२६, रा. तळेगाव दाभाडे), बसचालक शरण बसप्पा (२९, रा. चिखली, पुणे) या चौघांचा समावेश आहे. तर आरोही तिवारी या दोन वर्षाच्या मुलीला थोडे खरचटलेही नाही. देहुरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी कंपनीचे कामगार घेऊन पुणे-मुंबई महामार्गावरून तळेगावच्या दिशेने
जात असलेल्या बसगाडीला
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी मोटार देहूरोड येथील लष्करी
स्टेशन वर्क्सशॉप जवळ समोरून धडकली. त्याचवेळी मोटारीच्या मागे असणारी दुचाकी अपघातग्रस्त मोटारीवर आदळली. (वार्ताहर)