वीसगावमधील चार ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे, तर तीन काँग्रेसकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:32+5:302021-02-05T05:09:32+5:30

वीसगाव खो-यातील एकूण ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यातील नेरे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.तर बालवडी येथे राष्ट्रवादीने ७ ...

Four gram panchayats in Visgaon belong to NCP and three to Congress | वीसगावमधील चार ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे, तर तीन काँग्रेसकडे

वीसगावमधील चार ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे, तर तीन काँग्रेसकडे

वीसगाव खो-यातील एकूण ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यातील नेरे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.तर बालवडी येथे राष्ट्रवादीने ७ पैकी ४ जागा जिंकल्याने सत्तांतर होऊन काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे सत्ता आली आहे.धावडी ग्रामपंचायतीत एक जागा काँग्रेसची बिनविरोध झाली.तर निवडणूक झालेल्या ६ पैकी ६ जागा राष्ट्रवादीने जिंकल्याने काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे सत्ता आली आहे.पाले ग्रामपंचायतीत ७ पैकी ४ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.यामुळे सत्तांतर होऊन राष्ट्रवादीने ग्रामपंचायत जिंकली आहे.गोकवडी ग्रामपंचायतीत ७ पैकी ४ जागा जिंकून पुन्हा एकदा राष्ट्रवादीने सत्ता राखली आहे.काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. बाजारवाडी ग्रामपंचायतीत ७ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या.तर निवडणूक झालेल्या ५ पैकी ३ जागा राष्ट्रवादीने, तर २ जागा काँग्रेसने जिंकल्या असून बिनविरोध झालेल्या २ जागा काँग्रेसच्या असल्यामुळे ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे सत्ता आली आहे.

वीसगाव मधील सर्वांत मोठी आणी महत्त्वाची असलेली खानापूर ग्रामपंचायतीत ९ पैकी ५ जागा काँग्रेसने, तर ४ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत.यामुळे काँग्रेसला सत्ता कायम राखण्यात यश आले आहे.तर नेरे ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून काँग्रेसची सत्ता येथे कायम आहे.आंबाडे ग्रामपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी विरुध्द भाजप असा सामना झाला यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने ७ पैकी ७ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे.

वीसगाव खो-यातील मागील वेळी दोन ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे होत्या यावेळी ८ पैकी ४ ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत तर एक काँग्रेस आघाडीला एक ग्रामपंचायत मिळाली असल्याचे भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी सांगितले.

Web Title: Four gram panchayats in Visgaon belong to NCP and three to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.