शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात ऑनलाइन क्लासच्या बहाण्याने चार मुलींचा विनयभंग; कराटे शिक्षकास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By नम्रता फडणीस | Updated: June 4, 2025 16:20 IST

शिक्षेसह ४० हजारांचा दंड; दंडाची रक्कम पीडितांना देण्याचे आदेश

पुणे : कोरोना काळात ऑनलाइन कराटे शिकविण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींचा फिटनेस चेक करण्याच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या कराटे शिक्षकास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश (पोक्सो) कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला. तसेच, २ हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात यावेत. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने निकालात नमूद केले.

शंकर हनुमंत मालुसरे (वय ४४, रा. गणराज अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये, फिर्यादी व इतर तीन पीडितांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने गंभीर गुन्हा केला असून, त्याला जास्तीत-जास्त शिक्षा देण्याची मागणी ॲड. कोंघे यांनी केली.

या प्रकरणी, १७ वर्षीय पीडित विद्यार्थिनीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ८ ते १३ जून २०२० दरम्यान ही घटना घडली. मालुसरे हा कराटे शिक्षक आहे. तर, फिर्यादी ही त्याची विद्यार्थिनी आहे. ९ जून दिवशी ऑनलाइन कराटे क्लास घेण्यासाठी मालुसरे याने पीडितेस घरी बोलाविले. क्लास संपल्यानंतर पीडिता घरी जात असताना आरोपीने अंगावर फक्त अंतर्वस्त्र ठेवत पीडितेस फिटनेस चेक करण्यास सांगितले. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी फिर्यादी घरी जात असतानाही त्याने जबरदस्तीने हाच प्रकार केला. त्यानंतर पीडितेचा फिटनेस चेक करण्याच्या बहाण्याने कपडे काढून विनयभंग केल्याची घटना घडली. याखेरीज, त्याने पत्नी घरी नसताना अन्य विद्यार्थिनींना घरी बोलावून मसाजच्या बहाण्याने विनयभंग केल्याची फिर्याद विद्यार्थिनींनी पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, पीडितेच्या दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समजल्यानंतर अन्य तीन विद्यार्थिनींनी तपासी अधिकारी यांच्याकडे जाऊन त्यांच्यासोबत झालेली घटना कथन केली. यावेळी, आरोपी २०१८ पासून हा प्रकार करत असल्याचे समोर आल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य समोर आले. त्यानंतर, पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये, फिर्यादी व इतर तीन पीडितांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने गंभीर गुन्हा केला असून, त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ॲड. कोंघे यांनी केली. या प्रकरणात, बचावपक्षातर्फे ॲड. इब्राहिम शेख यांनी काम पाहिले. न्यायालयाने सरकार पक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला शिक्षा सुनावली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCourtन्यायालय