एकाच सोसायटीत फोडले चार फ्लॅट

By Admin | Updated: February 15, 2017 01:55 IST2017-02-15T01:55:21+5:302017-02-15T01:55:21+5:30

शहराच्या उपनगरांमध्ये चोरट्यांचा उच्छाद सुरूच आहे. धानोरीमधील लक्ष्मीनगर सोसायटीतील तब्बल चार फ्लॅट फोडण्यात आले

Four flats blown into a single society | एकाच सोसायटीत फोडले चार फ्लॅट

एकाच सोसायटीत फोडले चार फ्लॅट

पुणे : शहराच्या उपनगरांमध्ये चोरट्यांचा उच्छाद सुरूच आहे. धानोरीमधील लक्ष्मीनगर सोसायटीतील तब्बल चार फ्लॅट फोडण्यात आले असून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. हा प्रकार २ ते १३ फेब्रुवारीदरम्यान घडला.
या प्रकरणी दीपक रंजन (वय ३३, रा. लक्ष्मीनगर सोसायटी, धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. रंजन हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. या कालावधीमध्ये अज्ञात आरोपीने त्यांच्या दरवाजाचे कुलूप उचकटले. घरामध्ये प्रवेश करीत बेडरूममधील कपाटात असलेली ५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने व शिक्का असे एकूण १ लाख ९७ हजार ९२२ रुपयांचा ऐवज लंपास केला. सचिन रामकुमार गुप्त, रोनाल्ड सिडनी आनंदराव गिडतुरी, नरेंद्र ईश्वर वाघमारे यांच्याही सदनिका फोडण्यात आल्या आहेत. हे तिघेही कुटुंबासोबत बाहेरगावी गेलेले असल्यामुळे नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

Web Title: Four flats blown into a single society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.