आरोपींना चार दिवसांची कोठडी

By Admin | Updated: October 22, 2016 03:48 IST2016-10-22T03:48:31+5:302016-10-22T03:48:31+5:30

खराबवाडी येथील चाकण-तळेगाव रोडवरील कॉटन कंपनीत गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागल्यामुळे चार महिला व एक पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी सना

Four days in jail for the accused | आरोपींना चार दिवसांची कोठडी

आरोपींना चार दिवसांची कोठडी

चाकण : खराबवाडी येथील चाकण-तळेगाव रोडवरील कॉटन कंपनीत गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागल्यामुळे चार महिला व एक पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी सना इंटरप्रायजेसचे मालक जावेद खान आणि अरिफ खान यांना आज राजगुरुनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना २४ आॅक्टोबरपर्यंत म्हणजेच चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व प्रवीण मुंडे यांनी दिली.
गुरुवारी झालेल्या या घटनेत कल्पना विजय शिरसाठ (वय २९), राधा हरीष ठाकूर (वय २६), उज्ज्वला दिलीप सोनसाले (वय ३५), कुसुम संदीप साखरकर (वय ३०), रामदास परशुराम राठोड (वय ५२) यांचा मृत्यू झाला. खराबवाडीत एका कॉटन कंपनीला गुरुवारी मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. चार महिला आणि एका पुरुषाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सना इंटरप्रायजेसचे मालक जावेद खान आणि अरिफ खान यांना चाकण पोलिसांनी अटक करून शुक्रवारी राजगुरुनगर न्यायालयात हजर केले. (वार्ताहर)

Web Title: Four days in jail for the accused