‘त्या’ एजंटांना चार दिवसांची कोठडी
By Admin | Updated: September 21, 2014 00:23 IST2014-09-21T00:23:29+5:302014-09-21T00:23:29+5:30
परमिट नसतानाही आरटीओमधून परस्पर मीटर पासिंग करून घेऊन रिक्षाचालकांची 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन एजंटांना हडपसर पोलिसांनी अटक केलीे आहे.

‘त्या’ एजंटांना चार दिवसांची कोठडी
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी रविवारी (दि. २१) यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी तीन वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद खुले असून, काँग्रेसने श्रीराम महाजन यांना आणि शिवसेनेने अनिलकुमार चोरडिया यांना उमेदवारी दिली आहे.
पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड उद्या होते आहे. घरभेदीपणा व दगाफटका होऊ नये म्हणून युती व आघाडीने आपापल्या सदस्यांना बाहेर अज्ञातस्थळी नेऊन ठेवले आहे. रविवारी दुपारी मतदानाच्या वेळी या सदस्यांना थेट सभागृहात हजर करण्याची तयारी केली आहे.
आघाडीतील उमेदवारीचा वाद मिटला असून, भराडी (ता. सिल्लोड) गटाचे काँग्रेस सदस्य श्रीराम महाजन यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.
काँग्रेसचे गटनेते विनोद तांबे यांनी महाजन यांच्यासाठी आपला दावा मागे घेत, काँग्रेस आघाडीतील संभाव्य फूट टाळली आहे.