कुकडीच्या चारही धरणांतून विसर्ग

By Admin | Updated: September 8, 2014 04:14 IST2014-09-08T04:14:59+5:302014-09-08T04:14:59+5:30

आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असल्याने कुकडी प्रकल्पांतर्गत पाच धरणांपैकी वडज, पिंपळगाव जोगा, डिंभा आणि येडगाव ही धरणे भरली आहेत

Four cucumber dams | कुकडीच्या चारही धरणांतून विसर्ग

कुकडीच्या चारही धरणांतून विसर्ग

नारायणगाव : आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असल्याने कुकडी प्रकल्पांतर्गत पाच धरणांपैकी वडज, पिंपळगाव जोगा, डिंभा आणि येडगाव ही धरणे भरली आहेत. पाणीपातळी समतोल ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूआहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सर्व धरणांत २५ हजार ५२७ द.ल.घ.फूट म्हणजे ८३.५९ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१च्या वतीने देण्यात आली.पाच धरणांमधून २५ हजार ५२७ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
गतवर्षी या दिवसाअखेर २५ हजार ७७८ द.ल.घ.फूट पाणीसाठा (८४.४२ टक्के) उपलब्ध होता. (वार्ताहर)

Web Title: Four cucumber dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.